Wednesday, 29 May 2013

विवाहविशेष डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम

Man is a social animal                                           माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.
Man is a crying animal                                          माणूस हा रडणारा प्राणी आहे.
Man is a Laughing animal                                              माणूस हा हसणारा प्राणी आहे.
Man is a loving animal                                          माणूस हा प्रेमळ प्राणी आहे.
Man is a cultured animal                                               माणूस हा सुसंस्कृत प्राणी आहे.
Man is an emotional animal                                         माणूस हा भावनाशील प्राणी आहे.
माणूस जन्माला आल्यापासून शेवट पर्यंत त्याला कोणाची न कोणाची सोबत, साथ-सांगत लागते. लहानपणी आई वडिलांची, तरुणपणी जीवनसाथीची आणि वृधापाकाळ आल्यावर अपत्यांची सोबत त्याला हवीशी असते.
पौगंड अवस्थे पासून प्रत्येक मनाच्या एखाद्या कोपऱ्यातून काही नवीन कवाडे उघडायला सुरुवात होत असते. तारुण्याच्या उंबरठ्यावर निर्माण होणाऱ्या भावना आपल्याला हव्या आहेत की नको आहेत हेच समजत नसते. कधी फुलपाखरासारखे स्वछंदी फिरणारे मन अचानक कुठे एखाद्या पर्वताएवढे ओझे घेऊन थकून गेलेले असते. नको असतानाही मनात डोकावणाऱ्या ह्या सुखावणाऱ्या यातना (pleasant pain) प्रत्येक मनाला स्पर्शून जातातच. स्वतःला वास्तववादी म्हणवून घेणारे भले ते मान्य करत नाहीत आणि कवी मनाचे ते निखळ पणे मान्य करतात पण बाकीचे ही ह्या ‘दर्द’ चा आनंद घेत असतात.
शिक्षण आणि नोकरी-व्यवसाय ह्यात स्वतःला रमवून घेणे आणि आपल्याला हवीहवीशी वाटणारी सोबत नकळत शोधात राहणे हे काम मात्र अविरत चालूच असते. आपल्याला करियर करायचे असते ते सुद्धा ह्या जीवनसाथी साठीच.
अशा ह्या आयुष्याच्या सोबती करता आणि त्यात निर्माण होणाऱ्या असंख्य भावना उलगडून दाखवणे तसेच ह्या प्रवासात भेटणाऱ्या नेसाम्भांडावर प्रकाश टाकण्याकरता हा नवीन ब्लॉग.
हा ब्लॉग तारुण्य सुलभ प्रेम भावना, जीवनसखा (किंवा सखी) विषयी अपेक्षा, त्यातील तरल भाव-भावना, विश्वास, आवडी-निवडी, छंद, प्रेमविवाह, ठरवून केलेला विवाह, बघण्याचा कार्यक्रम, लग्न संबंधी डेटिंग या वा अशा सर्व विषयाकरता केलेला आहे. ह्या ब्लॉगवर  आपल्या कविता, लेख, विचार, विनोद, फोटो पाठवण्याकरता Vivahvishesh@gmail.com  वर संपर्क साधावा.


-हेमंत मांडके